दैनंदिन एकनाथी भागवत
आतां वंदू जनार्दनु । जो भवगज पंचाननु । जनों विजनीं समानु । सदा संपूर्ण समत्वें ।।१-७९।। " जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरू. त्यांचा महिमा एकनाथ महाराजांनी जो वर्णिला आहे तो महिमा आपल्या स्वतःच्या गुरुनांही उद्देशून यथार्थच आहे. ते म्हणतात_"माझे गुरू जनार्दन स्वामी म्हणजे संसाररूप हत्तीचा नाश करणारे सिंहच आहेत. त्यांचे वागणे एकांतात काय किंवा समाजात काय, सर्वत्र सारखेच असते. त्यांची दृष्टी सर्वांवर सारख्याच कृपेने पडत असते. त्यांची कृपा झाली की साधक देहधारी असूनही देहाचा अहंकार त्याच्या ठिकाणी नसतो. संसार हा जरी वावटळीसारखा सर्व काही उडवून नेणारा असला तरी त्यांच्या कृपेने ती वावटळ एकदम शांत होते. त्यांची कृपा असेल तर जे इंद्रियांना कळत नाही व मनाने, बुद्धीनेही पाहता येत नाही ते ब्रह्म निजरूपातच पाहता येते; आणि पाहणारा सुद्धा तेथे विलयास जातो. त्यांनी जीवभावच नष्ट केला की जगातील मी_तूते_आदी भेदभाव नाहीसा होतो व जीवन परम व्यापक होते. देहाचा मृत्यू येण्याची साधकावर वेळच येत नाही, कारण साधकाच्या अखंड चेतन जीवनात मृत्यूला स्थानच उरत नाही, मरण व जीवन हा भेदच नाहीसा होतो. त्य...