दैनंदिन एकनाथी भागवत

 आतां वंदू जनार्दनु । जो भवगज पंचाननु ।

जनों विजनीं समानु । सदा संपूर्ण समत्वें ।।१-७९।।

" जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरू. त्यांचा महिमा एकनाथ महाराजांनी जो वर्णिला आहे तो महिमा आपल्या स्वतःच्या गुरुनांही उद्देशून यथार्थच आहे. ते म्हणतात_"माझे गुरू जनार्दन स्वामी म्हणजे संसाररूप हत्तीचा नाश करणारे सिंहच आहेत. त्यांचे वागणे एकांतात काय किंवा समाजात काय, सर्वत्र सारखेच असते. त्यांची दृष्टी सर्वांवर सारख्याच कृपेने पडत असते. त्यांची कृपा झाली की साधक देहधारी असूनही देहाचा अहंकार त्याच्या ठिकाणी नसतो. संसार हा जरी वावटळीसारखा सर्व काही उडवून नेणारा असला तरी त्यांच्या कृपेने ती वावटळ एकदम शांत होते. त्यांची कृपा असेल तर जे इंद्रियांना कळत नाही व मनाने, बुद्धीनेही पाहता येत नाही ते ब्रह्म निजरूपातच पाहता येते; आणि पाहणारा सुद्धा तेथे विलयास जातो. त्यांनी जीवभावच नष्ट केला की जगातील मी_तूते_आदी भेदभाव नाहीसा होतो व जीवन परम व्यापक होते. देहाचा मृत्यू येण्याची साधकावर वेळच येत नाही, कारण साधकाच्या अखंड चेतन जीवनात मृत्यूला स्थानच उरत नाही, मरण व जीवन हा भेदच नाहीसा होतो. त्यांचा महिमा काय सांगावा ? साधकाची दृष्टीच ते हिरावून नेतात, म्हणजे मग त्यांच्या डोळ्यांना दृश्य जग, त्याचे व्यवहार, त्यातील भेदभाव, नाना प्रकारचे पदार्थ व व्यक्ती, वेगळ्या दिसतच नाहीत. त्याला मग दृश्य जगाच्या मागे जे अदृश्य अखंड ब्रह्म आहे त्याचाच प्रत्यय येतो. मग डोळे हे एकच इंद्रिय पाहणारे राहत नाही, तर सारे शरीरच सर्वत्र सर्वपणाने पाहते. देहावर साधकाची आसक्ती उरत नाही. मग देह असून साधक विदेही.! आणि विदेही म्हणण्याइतका नकारात्मक असा सुद्धा देहाचा उल्लेख उरत नाही. " उरत नाही " असे म्हणतांना " पूर्वी तो होता " हा भाव येतो. पण गुरू तोही ठेवीत नाहीत. ! "

गुरू हे असाराला सार करतात !

लेखक : दिवाकर अनंत घैसास

Comments

Popular posts from this blog

दैनंदिन एकनाथी भागवत

दैनंदिन एकनाथी भागवत

दैनंदिन एकनाथी भागवत